कांदा म्हणायला गेलात तर आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये लागतोच लागतो त्याच्याशिवाय भाजी पूर्ण होतच नाही. कांद्या मुळे भाजीला एक चव येते गोडी येते. त्यामुळे भाजीत कांदा हा हवाच. शिवाय त्याचबरोबर कांदा कच्चा ही खायला हवा. त्यामुळे त्यात असते घटक तुमच्या शरीराला जसेच्या तसे मिळतात.
हा कच्चा कांदा खाल्ल्यामुळे अनेक आजार तुमच्यापासून लांब राहतात. बघुया तर आज आपण कच्चा कांदा खाल्ल्यावर आपल्या शरीराला काय फायदा मिळतो.
कांदा खाण्याचे फायदे
कांदा हा भाजीत तर आपण टाकतो पण तो कच्चा खायला हवा. आता तुम्ही म्हणाल कच्चा खायला आवडतं नाही, वास येतो. पण हा कच्चा कांदा तुमचे अनेक आजार कमी करू शकतो हे माहीत आहे का? तुम्हाला पाहिलं तर या जगात बहुतेक लोक हे उच्च रक्तदाब या आजाराने घेरलेले आहेत. किती औषध घेतले तरी तेवढ्या पुरते त्यापेक्षा रोज कच्च्या कांद्याचे सेवन जेवना सोबत करा. यामुळे काय होते तर तुमचा रक्त दाब नेहमी नियंत्रणात राहातो.
कॅन्सर या प्राणघातक आजाराशी लढण्याकरिता त्या व्यक्तीने नियमित न चुकता कच्चा खाणे गरजेचे आहे. हा आजार संपूर्ण बरा तर नाही होऊ शकत पण त्याच्या विरुध्द लढण्याचा ताकद मात्र या कांद्यात असते.
रोज कच्चा कांदा खाल्ल्याने तुमचा मधुमेह या आजारापासून ही रक्षण होते.

कच्चा कांदा सध्या नियमित खाणे खूप गरजेचे आहे. कारण यात असते व्हिटॅमिन सी यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि होणाऱ्या आजारांपासून रक्षण होते.
उन्हाळ्यात कांदा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात होणारे डी हायड्रेशन होत नाही. कांदा आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी पाण्याची पातळी भरून काढते.
कांदा खाल्ल्यामुळे मुर्त्र संक्रमण याची समस्या ही दुर होते.
रोज कांदा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवत नाही.
कांद्यामुळे व्हिटॅमिन A असते. त्यामुळे हे तुमच्या डोळ्यांसाठी उत्तम आहेत.
कांद्याचा रस काढून केसांना लावला केस गळणे थांबते.
बाळंतीण बाईने कांदा खाणे अगदीच उत्तम असते त्यामुळे तिला दुधाची रूद्धी जास्त होते.
जेवणासोबत रोज कच्चा कांदा खा त्यामुळे तुम्हाला होणारे अपचन, गॅस इत्यादी पासून सुटका मिळते.
डोके दुखत असेल तर अशा वेळी कांदाचा रस काढावा आणि हा रस कपाळावर चोळावा.
रोज उत्तम आणि पौष्टीक आहात घेणे हाच आपल्या उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आणि म्हणून त्यासाठी कांदा खाणे गरजेचे आहे.
हे पण वाचा
- लॉक डाऊन आणि तिला दिलेली लिफ्ट
- गावठी तूप खाण्याचे फायदे
- बोरं खाण्याचे फायदे
- कडीपत्ता खाण्याचे फायदे
- नाचणी खाण्याचे फायदे