Home हेल्थ ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाण्याचे फायदे

by Patiljee
20362 views
ओवा खाण्याचे फायदे

ओवा तसा म्हणायला गेलात तर चवीला तिखट जिभेवर ठेवताच संपूर्ण तोंड भाजून निघते. पण तरीही ओवा खाण्याची एक पद्धत असते त्यामुळे तोंड भाजत नाही. म्हणजे ओवा कधीही कच्चा खाऊ नये. त्यामुळे तो जास्त तोंडाला भाजत असतो. त्यामुळे नंतर जेवताना कसली चव ही लागत नाही.

त्यासाठी ओवा थोडा भाजून घ्यावा. तुम्हाला नुसता खायला आवडतं नसेल तर त्यात थोडे तील थोडी अलशी मिसळा. आणि आपल्या शरीराला ही त्याचे हवे आहेत ते परिणाम दिसून येतात.

ओवा खाण्याचे फायदे

ओव्याचा सर्वात जास्त उपयोग म्हणजे आपल्या पोटाच्या विकारांसाठी ओवा एक उत्तम औषध मानले जाते. पोटात गॅस झाला असेल तर ओवा खा किंवा अपचन झाले असेल किंवा उलट्या आम्लपित्त झाले असले तरीही ओवा खा.

तुम्हाला जर वाताचा आणि कफाचा त्रास होत असेल तर तुम्ही नियमित होवा खाणे हिताचे आहे.

त्याचप्रमाणे जर पोटात जंत झाले असतील तरी ओवा खाणे उत्तम

तुमच्या छातीत कफ झाला असेल तर अशा वेळी ही भाजलेल्या ओव्या मध्ये थोडा मध मिसळा आणि हे खा.

जर तुमची दाढ दुखत असेल तर अशा वेळी लवंग तेल घेऊन त्यात थोड ओव्याचे तेल मिसळा आणि कापसा त भरून दाढेत ठेवा.

ओव्याच्या पावडरचा वास घेतल्यावर डोकं दुखत असेल ते लगेच थांबते.

गुडघे किंवा सांधे दुखत असतील तर आराम मिळण्यासाठी त्यांच्यावर ओव्याचं तेल चोळावे. किंवा ओवा गरम करून एका रुमाल मध्ये बांधून त्याने शेक द्यावा.

लहान बाळाला सर्दी खोकला झाला असेल तर ओवा खाऊन त्याची वाफ नाका तोंडात द्यावी.

बाळंतीण बाईने जेवल्यावर रोज ओवा खाऊन गरम पाणी पिणे उत्तम त्याने पोट साफ राहते.

नक्कीच तुम्हाला ओव्याचे हे उपयोग वाचून समाधान वाटले असेल. तुम्ही सुद्धा घरात ह्याचा उपयोग करा.

हेल्थ संदर्भात हे आर्टिकल सुद्धा वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल