Home कथा ऑफिस मधील नाईट शिफ्ट

ऑफिस मधील नाईट शिफ्ट

by Patiljee
2059 views
नाईट शिफ्ट

आज बऱ्याच वर्षांनी ऑफिस मध्ये माझी नाईट शिफ्ट लागली होती. अकरा ते सकाळी सात वाजता जेव्हा जग झोपत तेव्हा आपण मात्र रात किड्यासारखे जागून काम करायचे जणू हेच नाईट शिफ्ट वाल्यांचे आयुष्य असते. बऱ्याच वर्षांनी असे काही अनुभवता येईल म्हणून थोडा आनंदित तर होतो पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही.

ह्याचे कारण म्हणजे माझाच एक सोबती जयेश ह्याने मला रात्री घडणाऱ्या काही विचित्र गोष्टी बद्दल सांगितले. आता विचित्र गोष्टी म्हणून थोड तुम्ही अचंबित व्हाल. विचित्र म्हणजे भूत प्रेत गोष्टी. माझा ह्या गोष्टीवर कालही विश्वास नव्हता आणि आजही नाही. तुम्ही सुद्धा हेच मानत असाल. पण कदाचित मला आज ह्याचा थोडा का होईना प्रत्यय आला.

जयेश महिन्यातून एक पूर्ण आठवडा तरी नाईट करतो. त्यामुळे त्याला इथला चांगलाच अनुभव आहे. त्याच्यामते रात्री १२ नंतर अचानक वेगवेगळे आवाज ऐकू येतात, प्रत्येक कामगाराला वेगळा आवाज येतो. मला आलेला आवाज दुसऱ्या कुणाला येत नाही. अचानक खिडक्या उघडतात, पीसी चालू होतात, रात्री थोडी झोप लागली तरी कोण आपला गला दाबतोय का असा भास होतो.

त्याच्या ह्या सांगण्यावर मी खूप हसलो. अरे बाबा जयू कोणत्या जगात राहतोस तू. आवाज येतात कारण बाजूलाच एक बार आहे तिथल्या Dj गाण्यांचा आवाज असेल. आजकालची Dj गाणी कोणत्याही हॉरोर मूवी पेक्षा कमी नाहीत. खिडक्या तर वाऱ्याने पण उघडू शकतात. आणि कॉम्प्युटर चालू ह्यासाठी होत असतील की एखादा उंदीर कॉम्पुटर माऊस थोडा तरी हलवला तरी कॉम्प्युटर आपोआप चालू होतात.

खरतर मी त्याला खूप समजावले पण माझा पहिलाच दिवस आहे त्यामुळे तुलाही कधी ना कधी असा अनुभव येईल तेव्हा तुला खर वाटेल असे म्हणून तो त्याच्या कामाला लागला. मला सुद्धा थोडी भीती वाटली खरी पण मी माझ्या कामात मग्न झालो. रात्रीचे १.३० तरी वाजले असतील आणि मी डेस्क वरून उठलो. प्रत्येक मुलगा आपापली कामे करत होता.

थोडा हलका होण्यासाठी मी बाथरूम कडे वळलो. आरशासमोर राहून तोंडावर थोड पाणी मारून आलेल्या झोपेला उडवून लावलं. भिजलेले हाथ सुकविण्यासाठी Hand ड्रायर कडे वळलो आणि हाथ सुखवू लागलो. ह्या Hand ड्रायर आवाज सुद्धा एवढा कर्कश असतो की ऐकावसा वाटतं नाही पण काय करणार म्हणून गप्प बसलो.

मी बाहेर पडणार तेवढ्यात बाजूच्या बंद असलेल्या लेडीज वाशरूम मधून मला Hand ड्रायरचा तो कर्कश आवाज कानी पडला. मी थोडा संभ्रमात पडलो की रात्री तर मुले असतात नाईट शिफ्ट साठी फक्त मग आतून हा आवाज येतो कसा. मी बाहेर आलो आणि जयेशला ही गोष्ट सांगितली. तो ही घाबरला मी तुला बोललो होतो ना असे काही ना काही घडते जाऊ नकोस परत तिथे बस आणि गप्प कामे कर.

पण माझे मन लागत नव्हते नक्की आवाज कसा येतोय हे मला पाहायचे होते. मी परत तिथे गेलो तर आवाज येत नव्हता. वाशरूमला बाहेरून लॉक होतं. मी मागे वळणार तेवढ्यात परत तोच कर्कश आवाज सुरू झाला. आता मात्र मी चांगला घाबरलो. मला घाम फुटला. पळत पळत येऊन सीटवर बसलो. ऑफिस मध्ये एवढ्या Ac असून सुद्धा माझा घाम काही जात नव्हता.

ती रात्र मी अजिबात इकडे तिकडे डोकावले नाही. गप गुमान लॅपटॉप मध्ये काम करत बसलो. दुसऱ्या दिवशी घरी जाऊन थोडी झोप काढली आणि उठलो तेव्हा सर्व ठीक वाटतं होतं. मी थोडा विचार केला की Hand ड्रायर खराब असेल. अचानक चालू होत असेल. असे भूत वैगेरे काही नसते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिस मध्ये गेलो आणि Hand ड्रायर दुरुस्ती वाल्याला बोलावले तर तो म्हणाला की हा आताच दोन महिन्यापूर्वी लावला आहे. एकदम ओके आहे काहीच प्रोब्लेम नाही.

हे ऐकून माझ्या मनात नकळत आता असे वाटायला लागले आहे की भूत खरंच असतात का? मित्र मैत्रिणींनो तुम्हाला असा अनुभव आला आहे का? तुमचे ह्या प्रकरणावर काय मत आहे? मला नक्की सांगा.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

ह्या पण भयकथा वाचा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल