सध्या अळूच्या वडीची पाने आपल्याला १२ ही महिने मिळतात. पण पावसाळी तसेच श्रावण महिन्यात अळूची वडी खाण्याची मजाच काही वेगळी असते. तसेच या महिन्यात अनेक सण येतात. त्या सणांना आपण देवांना नैवेद्य काढतो. त्यात ही अळूची वडी ही असतेच असते.
पहिला सन म्हणजे नागपंचमीला अळूची वडी असते. शिवाय गणपतीला ही अळूची वडी असतेच. साधी सोपी वडी कशी करायची तर पाहा अळूची पाने घ्या. ती पणे शिरा काढून चांगली पोळपाटावर लाटून घ्या. म्हणजे शिरा मोडतील. त्यानंतर बेसन त्यात एक चमचा तांदळाचे पीठ भाजून घ्या त्यात थोडा मीठ मसाला, गरम मसाला, चिंच गुळाचा कोल, तुम्हाला आवडत असल्यास आले लसूण पेस्ट घाला.
नाही घातली तरी छान होतात वड्या. हे मिश्रण पानांना व्यवस्थित लाऊन घ्या पातळ लावा. मस्त वड्याना वाफ आणा आणि थंड झाल्यावर कापून तळा. कुरकुरीत होतात करून पाहा.

अळूच्या पानांत असणारे गुणधर्म
अळूच्या पानामध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणत आढळतात. त्यामुळे तुमची त्वचा सतेज होण्यास मदत होते.
या अळूच्या वाड्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात शिवाय प्रतिकार शक्ती ही वाढते.
अळूच्या पानांत असणारे योग्य प्रमाणात कॅल्शिअम तुमची हाडे मजबूत ठेवतात.

यात असते आयर्न जे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
डोळ्याच्या प्रत्येक समस्येवर ही अळूची वडी लाभदायक आहे.
तसेच ज्यांना मधुमेह हा आजार आहे. त्यांनी आळू वडी खाल्ल्याने फायदा होतो साखर नियंत्रणात राहते.
प्रोटीनचा उत्तम घटक म्हणून आलू वडी खावी. पण ज्यांना युरिक असिडचा त्रास जास्त आहे, अशांनी कमी खावी. शिवाय ही गुणधर्माने गरम असते हे ही लक्षात घ्या.
हे आर्टिकल सुद्धा वाचा
- लसूण खाण्याचे हे अगणित फायदे वाचून तुम्ही रोज लसूण खाल.
- श्रावण महिना का विशेष मानला जातो?
- आंबेहळदचे हे उपयोग तुम्हाला माहीत नसतील