Home कथा अरे संसार संसार

अरे संसार संसार

by Patiljee
7875 views
संसार

आज घरी यायला दहा मिनिटे उशीरच झाला होता म्हणा पण त्यापेक्षाही आनंद ह्या गोष्टीचा होता की बायकोसाठी मोगऱ्याचा गजरा मिळाला होता. तिला खूप आवडतो मोगरा म्हणून ह्या लॉक डाऊन काळात सुद्धा संपूर्ण दुकाने उलथी पालथी घालून घेऊन आलो होतो. आमच्या लग्नाला सात महिने तरी झाले असतील. पाहायला गेलो तर अरेंज मॅरेज होत पण आमचे बोंडींग एवढ्या लवकर इतके छान जुळले होते की सर्वांना असेच वाटतं होत मी आमचे लव मॅरेज आहे.

गाडीची किल्ली ठरलेल्या ठिकाणी ठेऊन चेहऱ्यावरचा मास्क बाजूला काढला आणि घरात शिरताच हाताला Sanitizer लावला. रोज हसता चेहरा समोर घेऊन येणारी माझी सरकार आज मात्र समोर दिसत नव्हती. कदाचित आतमध्ये काही काम करत असावी. बाथरूममध्ये पाहिले तर अंघोळीला पाणी ओतून ठेवलं होतं. घरातून निघताना आणि घरी आल्यावर रोज अंघोळ आता होतेच. आधी मजबुरी होती पण आता सवय झाली आहे. काय करणार कोरोनाची कृपा. काळजी घेतलीच पाहिजे तरच आपण हे २०२१ पाहू शकतो.

सावत्र आई

अंघोळ झाली, बाहेर आलो. मॅडम समोरून गेल्या पण ना पाहिले, ना स्माईल केले. मातोश्री ने इशाऱ्याने सांगितले की तुमच्या बाई साहेब चिडल्या आहेत तुमच्यावर, पण मी मात्र संभ्रमात पडलो की नक्की चिडण्याचे कारण आहे तरी काय? आजच्या तारखेकडे लक्ष दिलं तर ना आज तिचा वाढदिवस होता ना कोणता महत्त्वाचा असा दिवस जो मी विसरलो असेल.

सरकार किचन मध्ये होत्या, घरातल्यांची नजर चुकवत मी सुद्धा किचन मध्ये शिरलो. अलगद सरकारना पाठीमागून मिठी मारली. नाकाने पाठीवरील केस अलगद बाजूला करत नाकातून निघणाऱ्या गरम वाफेला अलगद तिच्या मानेवर सोडले. एका क्षणार्धात लाजून ती कावरी बावरी झाली. सोडा ना कुणी पाहिल की, तुम्हाला ना वेळेचे कधीच भान नसते, असे लटक्या रागात म्हणत किचन मधून निघून बेडरूम कडे वळली.

मी ही तिच्यामागे बेडरूम मध्ये गेलो. तिचा हात हातात घेतला काय झालं सरकार? का स्वारी रुसलीय आमच्यावर? मला सांगा आपल्या समोरील फ्लॅट मधील निशाला तुम्ही काही म्हटलं आहे का? मी शंकेच्या भावनेने तिच्या ह्या प्रश्नाकडे पाहत राहिलो आणि म्हणालो का ग काय झालं? काही खास नाही वो पण कालपर्यंत ती मला वहिनी म्हणत होती आणि आज अचानक ताई म्हणली.

ही पण कथा वाचा क्षणिक सुख मिळवण्यासाठी लॉजवर जाता, मग वाचाच हे पूर्ण कथानक

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल