अडुळसा वनस्पती गावा ठिकाणी भरघोस वाढलेली आपण पाहिलेली असेल. तिचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो. पण नेमक्या कोणत्या हे तुम्हाला माहीत नसेल. अडुळसा बघायला गेलात तर तशी गावठी आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती पूर्वीपासून हीचा उपयोग गावातील लोक आपल्या आजारांवर करत आलेले आहेत. त्याचा परिणाम ही त्यांना चांगलाच दिसून आला आहे.
अडुळसा ह्या वनस्पतीचा गावातील लोकच उपयोग करतात असे नाही तर आता औषध बनवतानाही या वनस्पतीचा उपयोग केला जात आहे. आज बघुया या वनस्पतीचे आजारावर उपयोग.
अडुळसा वनस्पतीचे शरीरासाठी फायदे
तुम्ही ही वनस्पती तुमच्या घरात कुंडीत ही लावू शकता. उष्ण आणि दमट हवामानात ही वनस्पती चांगलीच वाढते. त्यामुळे एक तरी झाड हे आपल्या दाराशी असायला हवे हे झाड दोन ते तीन आठवड्यात चांगले रुजते.
या झाडाची पाने ही अत्यंत औषधी आहेत हे आपल्याला माहीतच आहे. याची पिवळी झालेली म्हणजेच पिकलेली पाने ही खोकल्याच्या औषधात वापरतात या औषधाने खोकला लवकर बरा होतो.
तसेच या पिकलेल्या पानांचा काढा घरातच बनवून खोकल्यावर औषध म्हणून घेता येतो. खोकला कोरडा असेल तर या अडुळसाच्या रसात थोडे मध घालून ते मिश्रण घ्या.
लहान मुलांना ही अडुळसा पानांचा रस काढून खोकल्यावर औषध म्हणून दिला जातो.
या पानांत असणारे घटक हे घशाच्या कोणत्याही आजारावर तसेच दम्यावर उपयोगी आहेत.
आरोग्यविषयक हे आर्टिकल पण वाचा
- अंगावरील प्रत्येक तीलाचे असते एक वेगळे महत्त्व
- तुमचीही तेलकट त्वचा आहे? का मग करा हे उपाय
- तिसऱ्या म्हणजे शिंपले कधी खाल्ले आहेत का तुम्ही?
- कोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप घरी असावे