Home हेल्थ अंगावरील प्रत्येक तीलाचे असते एक वेगळे महत्त्व

अंगावरील प्रत्येक तीलाचे असते एक वेगळे महत्त्व

by Patiljee
40695 views
चेहऱ्यावरील तील

आपल्या शरीरावर वेगवेगळ्या भागावर अनेक तील असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की हस्तरेखा शास्त्रात शरीरावर असलेल्या तील संदर्भात अनेक गोष्टी लिखित केल्या आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

शरीरावर असलेला काळा तील शुभ आणि अशुभ असे दोन्ही गोष्टी प्रदान करतो तर लाल असलेला तील अत्यंत शुभ मानला जातो.

स्त्री किंवा पुरुषाच्या ओठांच्या डाव्या बाजूला असलेला तील जोडीदाराच्या सोबत प्रेमपूर्ण नात्याची साक्ष देतो. तर उजव्या बाजूला असलेला तील जोडीदारासोबत असलेले होणारे वाद आणि असमंजसपणा दर्शवतो.

ज्या व्यक्तीच्या छातीवर डाव्या बाजूला तील असेल अशा लोकांचे लग्न जास्त वय झालं की होतं. असे लोक कामुक असतात तर ह्या लोकांना हृदयरोग चे आजार असू शकतात.

चेहऱ्यावरील तील

हस्तरेखा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातावर शुक्र पर्वत वर तील असेल अशी व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करते.

ज्या व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्यावर तील असेल अशी व्यक्ती आयुष्यात कितीही चांगले काम केली तरी यश प्राप्त करत नाही.

ज्यांच्या पोटावर तील आहेत अशांचे पोट लवकर सुटते. आणि बेंबीच्या डाव्या बाजूला असलेला तील उदर रोग आणि उजव्या बाजूला असलेला तील यौन रोग च्या समस्या दर्शवितो.

ज्या व्यक्तीच्या गल्यावर तील असतो अशा लोकांचा आवाज मधुर असतो.

ओठांच्या खाली असलेला तील खादाड म्हणजेच फुडी असतात. अशी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी प्रगती करते.

ज्या व्यक्तीच्या डोक्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूला तील असेल अशी व्यक्ती आयुष्यात खूप धन कमावतात. पण खर्चिक स्वभावामुळे लवकरच आर्थिक संकटात सुद्धा सापडतात.

ज्या व्यक्तीच्या डोक्यावर मध्यभागी तील असतो अशी व्यक्ती आयुष्यात नेहमीच भाग्यवान ठरतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना भाग्य साथ देते.

ह्या राशीच्या लोकांचे नशीब ह्या महिन्यात भाग्यवान ठरेल

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल